मुंबई : प्रतिनिधी
अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’ या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळतेय. रिलीजआधीच सिनेमाच्या तिकिटांची जोरदार विक्री सुरू झाली असून, अवघ्या ४८ तासांत‘दृश्यम ३’ने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. ‘दृश्यम 3’ पाहण्यासाठी चाहते किती आतुर आहेत, याचा अंदाज सिनेमाच्या ऍडव्हान्स बुकिंगच्या आकडेवारीवरून येतो. २७ डिसेंबरपासून सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू झाली. बुकिंग सुरू होताच प्रेक्षकांनी तिकिटांसाठी अक्षरश: गर्दी केली आणि अवघ्या काही तासांतच सिनेमाने कोटींची कमाई केली. हा सिनेमा २ ऑक्टोबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहेत.
पहिल्या २४ तासांत ‘दृश्यम ३’ने प्री-सेलिंगमधून ७ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. आता ४८ तासांहून अधिक काळाच्या ऍडव्हान्स बुकिंगचे आकडे समोर आले आहेत. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ब्लॉक केलेल्या सीट्स वगळता सिनेमाने ऍडव्हान्स बुकिंगमधून जवळपास ११ कोटी रुपयांची कमाई केली आहे. मेकर्सकडून आधीच ब्लॉक करण्यात आलेल्या सीट्सचा समावेश केल्यास हा आकडा १७.२४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचतोय. ऍडव्हान्स बुकिंगमध्ये दिल्ली-एनसीआरमध्ये सिनेमाला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. या भागात ‘दृश्यम ३’ने प्री-सेलिंगमधून २.१७ कोटी रुपयांची कमाई केल्याचं सांगितले जात आहे.
‘दृश्यम’ ही बॉलिवूडमधील यशस्वी फ्रँचायझींपैकी एक आहे. त्यामुळे २ ऑक्टोबरच्या सुट्टीच्या दिवशी ‘दृश्यम ३’चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित या सिनेमाची आतापर्यंत २.२३ लाख तिकिटं विकली गेल्याचं रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सिनेमाला आतापर्यंत एकूण ७,४८४शो मिळाले आहेत. प्रेक्षकांची मागणी वाढल्यास शोची संख्या आणखी वाढवली जाऊ शकते. विशेष म्हणजे ऍडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत ‘दृश्यम ३’ने आपल्या आधीच्या ‘दृश्यम २’लाही मागे टाकल्याचं सांगितलं जात आहे.अभिषेक पाठक दिग्दर्शित ‘दृश्यम ३’ हा या फ्रँचायझीचा शेवटचा भाग असल्याचे अजय देवगणने अलीकडेच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सांगितले होते. सिनेमात अजय देवगणसोबत तब्बू, श्रिया सरन, इशिता दत्ता आणि जयदीप अहलावत हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
















