31.1 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रदेर आये दुरुस्त आये!

देर आये दुरुस्त आये!

बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यावर मुंडेंच्या भगिनी आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचे स्वागत केले आहे.

याविषयी बोलताना, धनंजय मुंडेंचा राजीनामा फार आधीच घ्यायला पाहिजे होता असे त्यांनी म्हटले. तसेच त्यांचा राजीनामा अगोदर घेतला गेला असता तर त्याला गरीमामय एक मार्ग मिळाला असता, असेही त्यांनी यावेळी म्हटले. तसेच राजीनाम्यापेक्षा त्यांनी मंत्रिपदाची शपथच घ्यायला नको होती. त्यामुळे हे सर्व पुढे झालं नसतं’ असे रोखठोक मत पंकजा मुंडे यांनी मांडले.

पुढे बोलताना पकंजा मुंडे यांनी, संतोष देशमुखांच्या जीवाच्या, परिवाराच्या वेदनांपुढे राजीनामा काहीच नाही, मी संतोष देशमुखांच्या आईची माफी मागते असेदेखील त्यांनी यावेळी म्हटले. तसेच निर्दयीपणे माणसाला संपवणा-याला कुठलीही जात नाही असे म्हणत त्यांनी आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी देखील मागणी यावेळी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR