18.2 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरदेवणीत दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

देवणीत दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

देवणी : प्रतिनिधी
देवणी शहरात दुषित व दर्गंधी युक्त पाणीपुरवठा होत असल्यामुळें नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत प्रशासनाने स्वच्छ व नियमित पाण्याचा पुरवठा करावा याबाबतचे निवेदन नगर पंचायतीला देण्यात आले आहे. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन तहसीलदार गजानन शिंदे यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिले आहेत, शहरात टाकलेली पाईप लाईन खूप जुनी असल्याने जागोजागी गळतीचे प्रमाण वाढले आहे. नळाला तोट्या नसल्यामुळे सांडपाणी व गटाराचे दुषित पाणी पाईपलाईन द्वारे नागरिकांना पुरवठा होत असल्याचे डॉ घोरपडे यांनी सांगितले, प्रभाग क्रमांक १५ व १६ या भागात नियमीत पाणीपुरवठा होत नाहीच, महिन्यात केवळ दोन वेळा व ते पण एक तास पाणी पुरवठा होत आहे. शहराच्या अन्य भागात दोन दिवसा आड पाणी पुरवठा केला जातो. याशिवाय बोअर वेलच्या माध्यमातून स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जातो, प्रभाग क्रमांक १५ मधून स्वत: नगराध्यक्षा निवडून आल्या आहेत,

याबाबत संबधित नगरसेविकेस याची माहिती दिली परंतु कार्यवाही झाली नाही. दुषित व दुर्गंधी युक्त पाण्या मुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते. याबाबत नगर पांचयतेने तातडीने दखल घेऊन स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करावा अशी मागणी प्रभाग क्रमांक १५ व १६ मधील नागरिकांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आठ दिवसांत कार्यवाही न झाल्यास अथवा दुरुस्ती न झाल्यास नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR