डिजिटल पेमेंट करण्यात अडचणी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील विविध भागांत यूपीआय सेवा ठप्प झाली असून, लाखो नागरिकांना डिजिटल पेमेंट करण्यात अडचणी येत आहेत. अनेक यूपीआय युजर्सन तक्रार केली आहे की त्यांचे पेमेंट फेल होत आहे. विविध बँकांच्या ग्राहकांना यूपीआय द्वारे पैसे पाठवण्यात आणि ते प्राप्त करण्यात अडचणी येत आहेत. यूपीआय व्यवहारांशी संबंधित समस्यांबद्दल युजर्स सोशल मीडियावर त्यांच्या तक्रारी आणि संताप व्यक्त करत आहेत.
ग्राहकांना यूपीआयद्वारे पेमेंट करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे व्यवहारांवरही परिणाम होत आहे. ऑनलाइन शॉपिंग आणि ऍप्सवर पेमेंट फेल झाल्याच्या तक्रारीदेखील आल्या आहेत. काही युजर्सनी तक्रार केली आहे की त्यांचे फोनपे, गुगल पे आणि पेटीएम सारखे ऍप्स योग्यरित्या काम करत नाहीत. आज यूपीआय पेमेंट फेल्युअरचा सर्वाधिक फटका गुगल पे च्या युजर्सना बसला आहे. गुगल पे च्या ७२ टक्के युजर्सनी याबाबत तक्रारी नोंदवल्या. त्यानंतर वेबसाइट ऍक्सेस १४% टक्के आणि ऍप्सशी संबंधित समस्या १४ टक्के आहेत. त्याचप्रमाणे, पेटीएमवरील ८६ टक्के तक्रारी पेमेंटशी संबंधित होत्या. दरम्यान, लॉगिन आणि खरेदीशी संबंधित समस्यांचे प्रमाण अनुक्रमे ९ टक्के आणि ६ टक्के होते.