29.9 C
Latur
Monday, April 7, 2025
Homeमुख्य बातम्यादेशभरात श्रीराम नवमीची धामधूम

देशभरात श्रीराम नवमीची धामधूम

मुंबई : वृत्तसंस्था
श्रीराम नवमीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी झाल्यापासून राननवमीला नवचैतन्य प्राप्त झाले आहे. दरम्यान, यानिमित्ताने देशभरात सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेण्यात आली, विशेषत: ज्या राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून जातीय तणाव दिसून आला आहे, त्या राज्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. यूपी, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली.

उत्तर प्रदेश : रामनवमीनिमित्त उत्तर प्रदेशातील अयोध्या शहर विशेषत: सुरक्षेबाबत सतर्क आहे. अयोध्येला वेगवेगळ्या झोनमध्ये विभागण्यात आले, सर्व झोनमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय निमलष्करी दलही तैनात करण्यात आले. सरयू नदीच्या आसपास एनडीआरएफ आणि जल पोलीस सतर्क आहेत.
महाराष्ट्र : राम नवमीनिमित्ताने राजधानी मुंबईत १३,५०० हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत, ज्यात ११,००० कॉन्स्टेबल, २,५०० अधिकारी आणि ५१ सहायक पोलिस आयुक्तांचा समावेश आहे. शांतता राखण्यासाठी राज्य राखीव पोलीस दल आणि इतर विशेष तुकड्यांच्या नऊ तुकड्याही तैनात करण्यात आल्या. मुंबईसह राज्यातील विविध लहान-मोठ्या शहरांमध्ये पोलिस परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून होते.

पश्चिम बंगाल : रामनवमीनिमित्त पश्चिम बंगालमध्येही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कोलकातामध्ये पाच मोठ्या मिरवणुकांसह ५० हून अधिक लहान मिरवणुका निघाल्या. शहरात अतिरिक्त पाच हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. हावडा, सिलीगुडी, मालदा आणि मुर्शिदाबाद या राज्यातील विविध जिल्ह्यांतील संवेदनशील भागात विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
झारखंड : झारखंडमध्येही रामनवमीनिमित्त सुरक्षेच्या दृष्टीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. कोणत्याही समाजविघातक कारवायांना वेळीच आळा घालता यावा यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
बिहार : राजधानीत रामनवमीनिमित्त पाटणा परिसरात 2500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या दोन कंपन्यांसह ८०० अतिरिक्त फौजाही तैनात करण्यात आल्या. इतर राज्यांमध्येही कुठलाही अनिचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांसह विविध सुरक्षा दलांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR