लातूर : प्रतिनिधी
माजी मंत्री सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, सौ. अदितीताई अमित देशमुख, अभिजित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत कुटुंबीयांनी बाभळगाव येथील शेतामध्ये वेळा अमावस्यानिमित्त पूजा केली. स्नेही मित्र परिवारासोबत निसर्गाच्या सानिध्यात वनभोजनाचा आस्वाद घेतला. सर्वांना वेळा अमावस्या सणाच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, लातूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल उटगे, धनंजय देशमुख, मोईज शेख, प्रा. बी. व्ही. मोतीपोवळे, ललितभाई शहा, रवींद्र काळे, संभाजी सूळ, समद पटेल, चांदपाशा इनामदार, संभाजी रेड्डी, आबासाहेब पाटील, अविनाश देशमुख, सुरेश धानुरे, मोहन माने, श्याम भोसले, संतोष देशमुख, डॉ. स्नेहल देशमुख, डॉ. राजकुमार दाताळ, सर्जेराव मोरे, अॅड. प्रमोद जाधव, अनुप शेळके, पृथ्वीराज शिरसाठ, यशवंतराव पाटील, डॉ. वैशाली दाताळ, डॉ. संजय पौळ पाटील, डॉ. मीनाक्षी पौळ पाटील, डॉ. सतीश देशमुख, डॉ. कल्याण बरमदे, श्याम देशमुख, प्रा. प्रवीण कांबळे, लक्ष्मण कांबळे, सचिन दाताळ, प्रा. शिवाजी जवळगेकर, कैलास कांबळे, अनंतराव देशमुख, रामदास पवार, मकबूल वलांडीकर, हरिभाऊ गायकवाड, अहेमदखा पठाण, हरिराम कुलकर्णी, प्रा. एम. पी. देशमुख, तुळशीराम गंभीरे, गोविंद देशमुख, सचिन मस्के, इसरार पठाण, अब्दुल्ला शेख, मुक्ताराम पिटले, उमेश मस्के, कैलास कांबळे, युसूफ बाटलीवाले, आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.