24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरदेशाची राष्ट्रीय एकात्मता कायम राहू दे!

देशाची राष्ट्रीय एकात्मता कायम राहू दे!

लातूर : प्रतिनिधी
संपूर्ण जगामध्ये भारत असा एकमेव देश आहे. ज्या देशात विविध जाती-धर्माचे लोक एकमेकांशी सलोख्याने राहतात. सर्वांच्या एकोप्यामुळेच आपला देश विकासाच्या मार्गावर गतीमान होत आहे. अल्लाहू तआला भारत देश महासत्ता बनु दे, राष्ट्रीय एकात्मता कायम राहू दे, अशी दुआ मुफती सोहेल यांनी ईद-उल-अजहा (बकरी ईद) निमित्त अल्लाहकडे मागीतली.
लातूर शहरासह जिल्ह्यात  दि. १७ जून  रोजी ईद-उल-अजहा (बकरी ईद) पारंपारीक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत पाऊस होता. त्यामुळे शहरातील सर्वच मस्जिदांमधून ईदची नमाज झाली. ईदगावरही सकाळी ९.१५ वाजता नमाज झाली. पावसाची शक्यता लक्षात घेता शहरातील सर्वच मस्जिदींमधून ईदची नमाज तसेच ईदगाहवरही ईदची नमाज अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानिर्णयानुसार शहरातील मस्जिदींमधून सकाळी ७.३० वाजल्यापासून टप्प्याटप्प्यात ईदची नमाज झाली. ईदगाहवर सकाळी ९.१५ वाजता ईदची नमाज झाली.
शहरातील ईदगाहवर सकाळी ९ वाजता मुफती ओवेस यांचे प्रवचन (बयान) झाले. त्यांनी आपल्या प्रवचनात ईद-उल-अजहा (बकरी ईद) संबंधी माहिती सांगुन ईद-उल-अजहाचे ईस्लाम धर्मातील महत्व, ईद-उल-अजहा कशी साजरी करावी, या संदर्भाने सांगीतले. त्यानंतर सकाळी ९.१५ वाजता मुफती सोहेल यांच्या मागे ईद-उल-अजहाची नमाज झाली. नमाजनंतर मुफती सोहेल यांनी सर्व मानवी जीवन सुखी, समाधानी व्हावे, प्रत्येकाचे जीवन आरोग्यदायी व्हावे, नुकसान न कारता नफा देणारा पाऊस पडावा, अशी अल्लाहकडे प्रार्थना केली. त्याग, बलिदानाची शिकवण देणारी ईद-उल-अजहाला ईस्लाम धर्मियांमध्ये अनन्य साधारण महत्व आहे. या ईदनिमित्त सोमवारी  सकाळी मुस्लिम बांधवांच्या घराघरातून एकच लगबग दिसून आली. मुस्लिम बांधवांनी पारंपारीक पद्धतीने ईद साजरी केली. आपापल्या घरी शक्य ते गोडाधोड करुन त्यातच आनंद माणुन ईश्वराचे आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR