27.5 C
Latur
Wednesday, April 2, 2025
Homeलातूरदेशावरील आर्थिक संकट लवकर दूर होवो

देशावरील आर्थिक संकट लवकर दूर होवो

चाकूर : प्रतिनिधी
भारतीय संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. आपल्या देशात अनेक जाती धर्माचे लोक गुण्य गोविंदाने येथे राहतात.विविधेतच एकता आपल्या देशाचे वैश्ट्यिये आहे. हिंदू मुस्लिम सिख इसाई हम सब भाई-भाई असा संदेश ईद निमित्त देण्यात आला. इदगाह मैदानावर मुस्लीम बांधवानी पविञ रमजान ईदची नमाज पठण केली. रमजान महिन्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहता असतात. आपला देश आर्थिक मंदीत सापडला आहे. यातून लवकर निघावा म्हणून म्हणून ईश्वराकडे विशेष दुवा करण्यात आली.
इदगाह मैदानावर लहान मुले,तरूण,वयोवृध्द,सर्वांनी नवीन कपडे परिधान करुन आले होते. मैदानावर बसण्यासाठी भव्य मंडप टाकण्यात आला होता. मानवाला तूच जिवनदान देणार आहेस! आम्ही चुकलो क्षमा कर! हिच प्रार्थना करतोत! तु मातीपासुन शरीर निर्माण करणारा आहे आणि तुच मातीत हे नश्वर शरीर नष्ट करणारा आहे.! गरिबांच्या कष्टक-यांच्या आणि श्रीमंताचा दाता तुच आहेस, आपापसातील प्रेम चिरकाल टिकू दे, संपूर्ण जगाला एक संघ ठेव, पैगंबर [स.स.] यांनी गोष्टीचा अंगीकार करणारा बनावे. माणसाला माणूस म्हणून वागवणारा सृष्टीतील प्रत्येक जीविताशी प्रेम करा.,प्रत्येकावरील आर्थिक संकट दुर कर, अल्लाह जगातील प्रत्येक माणसाला सुखी कर मानवाला क्षमा कर.. अशी प्रार्थना मानवजातीसाठी केली.
यावेळी ईदगाह मैदानावर चाकूर नगरपंचायत नगराध्यक्ष कपील माकणे, बालाजी पाटील चाकूरकर, बालाजी सूर्यवंशी, भागवत फुले, युवराज पाटील, सुदर्शन स्वामी, अनिल वाडकर, सागर होलदांडगे, राम कसबे, शिवशंकर हाळे, संदीप शेटे, सजंय पाटील, नरसिंग गोलावार, चिंतामणी सिरसाठे, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांनी मुस्लीम बांधवाना ईदच्या शुभेच्छा दिल्या. साहाय्यक पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ईदगाह मैदानावर पोलीस निरीक्षक बबिता वाकडकर ,पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, चाकूर बिट अमलंदार बोळगे व श्रीमंत आरदवाड यांनी चोख पोलीस बंदोबस्त होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR