22.4 C
Latur
Thursday, November 6, 2025
Homeलातूरदोघे निलंबित, तिघांना केले कार्यमुक्त

दोघे निलंबित, तिघांना केले कार्यमुक्त

लातूर : योगीराज पिसाळ
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून घरकुलाचा लाभ देताना  मंजूर यादीत नावे नसलेले ६६ बोगस प्रस्ताव तयार करून त्या खात्यावर ७५ लाख १५ हजार रूपये वर्ग केले होते. सदर बाब समजताच अहमदपूर व जळकोट तालुक्यातील गट विकास अधिका-यांनी वर्ग झालेल्या पैशाची वसूली करून या प्रकरणी दोषी कर्मचा-यांचा अहवाल मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार त्यांनी दोन तालुक्याचे दोन शाखा  सहाय्यक निलंबीत केले. तर  दोन तालुक्यातील दोन ग्रामीण  निर्माण अभियंता व एक डाटा ऑपरेटर यांना सेवेतून कार्यमुक्त करण्याची कारवाई मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी केली आहे. या कारवाईमुळे अवैध काम करणा-यांनी धसकी घेतली आहे.
ग्रामीण भागातील नागरीकांचे जिवनमान सुधारावे, त्यांच्या डोक्यावर पक्या घराचे छत असावे म्हणून लातूर जिल्हयातील भटक्या विमुक्तांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून घरकुलाचा लाभ देण्याची प्रक्रीया सुरू होती. त्यानुसार जिल्हयात २०१६-१७ ते २०२४-२६ या कालावधीत २ हजार ५०८ घरकूलांना मंजूरी दिली असून ४७३ घरकूले पूर्ण झाली आहेत. तर उर्ववरीत २ हजार १९ घरकूलांचे काम सुरू आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतील घरकूलाचा लाभ देताना एका नागरीकाने  माझ्या खात्यावर घरकूलाचा हप्ता कसा वर्ग झाला नाही म्हणून  गटविकास अधिकारी यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी माहिती घेत असताना हा प्रस्ताव आपण  तयारच केला नव्हता, पण हा  प्रस्ताव गेला कसा हे पाहत  असताना बोगस घरकूलाचे प्रकरण उघडकीस आले असा दावा करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR