पुणे : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. धनकवडी आणि कोंढवा या भागातून या घटना उघडकीस आल्या आहेत. धनकवडीत एका तरुणाने नऊ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मुलीच्या आईला ही गोष्ट समजल्यानंतर मुलीच्या आईच्या तक्रारीवरून धनकवडीतील २१ वर्षीय तरुणाविरोधात पोस्को अंतर्गत सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे कोंढवा खुर्द परिसरातही एका ९ वर्षांच्या मुलीवर तिच्या सतरा वर्षांच्या सावत्र भावाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण या घटनेमुळे संपूर्ण कोंढवा परिसरात खळबळ उडाली आहे.