22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरदोन एप्रिलपासून थाटणार मीना बाजार,

दोन एप्रिलपासून थाटणार मीना बाजार,

सोलापूर : रमजान सणानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही विजापूर वेस येथे २ एप्रिलपासून मीना बाजार भरविण्यात येणार आहे. याव्यापारी संघाच्या अध्यक्षपदी मतीन बागवान यांची तर उपाध्यक्षपदी जिलानी कुरेशी व वसीम सालार यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष मतीन बागवान यांनी पत्रकार परिषदेत दिली. मागील ७५ वर्षापासून सोलापूर शहरातील विजापूर वेस परिसरात मीना बाजार भरविण्यात येतो. रमजान सणानिमित्ताने अनेक हिंदू मुस्लिम बांधव या परिसरात दुकाने थाटतात. शिरखुर्मासाठी लागणारा सुखा मेवा, कपडे, महिलांचे सौंदर्य प्रसाधने, तसेच धार्मिक ग्रंथ, लहान मुलांचे कपडे, चप्पल, अत्तर फरोश, खजूर व रमजान ईदसाठी लागणारे आवश्यक सर्व वस्तुचे साहित्य विक्रीची ५०० ते ७०० स्टॉल या मीना बाजारात असतात. व्यापारी ग्राहक यांच्या ‘सुसूत्रता आणण्याचे काम मीना बाजार व्यापारी संघाच्या वतीने करण्यात येते.

मंगळवारी (ता. २) पासून मीना बाजार भरविण्यास सुरवात होणार आहे. सोलापूर महानगरपालिका, राज्य विद्युत मंडळ, पोलिस खातेयांचेही मीना बाजार व्यापारी दरवर्षी मोलाचे सहकार्य लाभते. मीना बाजारामध्ये कोणत्याही व्यक्तीचे अथवा संस्थेचे बोर्ड लावण्यास परवानगी देऊ नये. डिजिटल फलकांमुळे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने मीना बाजार व्यापारी संघाच्यावतीने पोलिस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान, या ठिकाणी कचरा व्यवस्थापनही नेटक्या पद्धतीने करण्यात येणार आहे, असे मतीन बागवान यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत अजीज शेख, सलीम तुळजापूरे, मुकरी सालार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

मीना बाजार व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष साहीर सालार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हाजी मतीन बागवान यांची सन २०२४-२५ सालाकरिता अध्यक्षपदी निवड करण्यात आली. इतर पदाधिकाऱ्यांमध्ये सचिव अश्पाक बागवान, सहसचिव मुस्ताक नजम रंगरेज, खजिनदार अजीज शेख, कार्याध्यक्ष जाकीर नाईकवाडी, प्रमुख सल्लागार हाजी मैनोद्दीन शेख, हाजी मुनाफ चौधरी, शकील मौलवी, सलीम हिरोली, इम्रान सालार, मंजूर बागवान, हाजी तौफीक हत्तुरे, कलीम तुळजापूरे, राजा सिंदगीकर, जुबेर बागवान, महमदसाब सौदागर, याकुब शेख, इसाक शेख आदींची निवड करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR