27.7 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरदोन गटांत झालेल्या हाणामारीतील गंभीर जखमीचा मृत्यू

दोन गटांत झालेल्या हाणामारीतील गंभीर जखमीचा मृत्यू

किल्लारी : वार्ताहर
उमरगा -लातुर महामार्गावर दत्ता पाटीजवळील हॉटेल श्रावणीसमोर दि.८ एप्रील रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कार लावण्याच्या कारणावर वाद होऊन हाणामारीची घटना घडली. या हाणामारीत एकजण गंभीर जखमी झाला होता. त्यांच्यावरी दुस-या दिवशी लातूर येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आसताना जखमी मरण पावला असून या प्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि ८ एप्रील रोजी उमरगा-लातूर महामार्गावर दत्तापाटीजवळ हॉटेल श्रावणीसमोर फिर्यादी शिवम राम कदम (वय ३० रा पारधेवाडी ता.औसा) यांनी कार लावली. या कारणावरुन आरोपी तिघांनी मिळुन रणजित गुलाब बिराजदार, निवृत्ती आत्माराम बिराजदार , शुभम विष्णु गव्हाणे (सर्व रा गोठेवाडी ता.औसा) यांनी संगणमत करुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली.
या वेळी फिर्यादी शिवम कदमचा भाऊ स्वप्नील कदम, दशरथ शेखराव कव्हे हा मध्ये येऊन सोडवा सोडवी करीत आसताना आरोपी रणजित गुलाब बिराजदार, निवृत्ती आत्माराम बिराजदार  यांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील दगड फेकून त्याच्या डोकीत मारुन गभीर जखमी केले तसेच तुम्ही आमच्या नादाला लागलात तर असे म्हणून जिवे जिवे मारण्याची धमकी दिली.  फिर्यादीचा भाऊ स्वप्नील कदम यास किल्लारी येथे प्राथमिक उपचार करुन लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. येथे उपचार सुरू असताना तो मरण पावला.  या प्रकरणी किल्लारी पोलिस ठाण्यात आरोपी विरुध्द ३०७, ३३६, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादवि प्रमाणे गुन्हादाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस उपनिरक्षिक प्रशांत राजपुत हे करीत आहेत. या प्रकरणी  दोन आरोपीना अटक करण्यात आली असून एका   आरोपी एकास लवकरच अटक होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR