लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतक-यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी १९ आणि २० मे रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क मैदानावर जिल्हास्तरीय आंबा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून होणा-या या महोत्सवात केशर, बादाम, हापूस, अल्फान्सो, पायरी, लंगडा, तोतापुरी आदी दर्जेदार आंब्यांची विक्री होईल.
जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजना आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत गेल्या पाच वर्षांत आंबा लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. जिल्हास्तरीय आंबा महोत्सवात आंबा विक्रीसाठी स्टॉल नोंदणीसाठी शेतक-यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. टी. जाधव यांनी केले आहे. तसेच, लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी या महोत्सवात सहभागी व्हावे.