24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरदौंड -कलबुर्गी दौंड -डेमू रेल्वेस केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडून मंजुरीचे आश्वासन

दौंड -कलबुर्गी दौंड -डेमू रेल्वेस केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडून मंजुरीचे आश्वासन

सोलापूर : सोलापूर रेल्वे विभागातील मुंबई चेन्नई – मुंबई मेल एक्स्प्रेसच्या वेळेत तसेच महत्वाच्या प्रवासी रेल्वे रेल्वे प्रशासनाने रद्द केल्यामुळे, सोलापूरला येणार्‍या जाणार्‍या असंख्य प्रवाश्यांची गेली ४ वर्ष- पासुन गैरसोय होत होती.. प्रवासी सेवा संघाने सकाळच्या वेळी दौन्ड कलबुर्गी दौंडकडे व सायंकाळी कलबुर्गी येथून दौंड कडे डेमू रेल्वे सुरु करण्याचे निवेदने वेळोवेळी सोलापूर रेल्वे विभाग, क्षेत्रीय कार्यालय मुंबई, रेल्वे मंत्रालय व रेलवे बोर्ड दिल्ली तसेच या मार्गावरील लोकसभेचे खासदार यांचे कार्यालयास सादर करण्यात आलेली होती.

सोलापूर रेलवे विभागात प्रवाश्यांच्या अडचणी / प्रवासी समस्या आहेत .परंतु सर्वात महत्वाची ‘दौण्ड-कलबुर्गी दौण्ड ‘ही डेमू नवीन रेल्वे सुरू होण्यासाठी प्रवासी सेवा संघाते पाठपुरावा केलेला आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातील बाबींचा विचार करून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वीनी वैष्णव यांचेसमवेत दिल्ली येथे बैठकीचे आयोजन करून सदरची डेमू बाबतचीमाहिती विषद करून दौण्ड-कलबुर्गी दौण्ड डेमू सुरू करणे‌बाबतची सकारात्मक चर्चा झाली व नवीन डेमू सुर, करण्याचे आश्वासन दिलेले आहे.

सदर बैठकीस खासदार डॉ जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी,प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील सचिव संजय चौगुले व कोषाध्यक्ष तथा विभागप्रमुख नंदु दळवी रेल्वेच्या रेल भवन नवीदिल्ली येथे उपस्थीत होते. भविष्यात दौंड-कलबुर्गी ही डेमू सकाळी ५.०० वा.सुटून परतीच्या प्रवासाकरीता कलबुर्गी येथन दुपारी ४.०० वाजता दौण्डकडे सुटणार आहे.

या डेमूस भीगवण,पारेवाडी,जेऊर,केम,कुर्डुवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, होटगी, अक्कलकोट रोड, बारोटी दुधनी, गाणगापूर रोड असे थांबे प्रस्तावीत आहेत. सदरची डेमू सुरु झाल्यास डबेवाले, भाजीपाला विक्रेते, व्यापारी , विद्यार्थी शेतकरी शेतम‌जूर मासिक त्रैमासीक तसेच प्रवासी व भावीक यांची गैरसोय दूर होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR