35.9 C
Latur
Tuesday, April 1, 2025
Homeमुख्य बातम्या‘द्रमुक’चा सुपडासाफ करणार : अमित शहा

‘द्रमुक’चा सुपडासाफ करणार : अमित शहा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तामिळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षावर टीका करत २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूतून द्रमूकचा सुपडासाफ करणार, असा इशारा शहा यांनी दिला आहे. नवी दिल्लीत एका न्यूज चॅनेलतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना शहा यांनी हे वक्तव्य केले.

अमित शहा म्हणाले की, तामिळनाडू एकेकाळी अत्यंत प्रगत राज्य होते, परंतु ‘डीएमके’ सरकारच्या धोरणांमुळे ते अराजकतेच्या गर्तेत सापडले आहे. त्यामुळे लोक नाराज झाले असून, ते पुढील विधानसभा निवडणुकीत या सरकारला सत्तेवरून हटवण्यास तयार आहेत. मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा सत्ताधारी ‘डीएमके’ हा तमिळविरोधी आहे. तामिळनाडू सरकारने अद्याप तामिळ भाषेत वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण सुरू केलेले नाही. तमिळ भाषेत पुस्तकेदेखील भाषांतरित केलेली नाहीत.

शहा म्हणाले, २०२६ च्या विधानसभा निवडणुकीनंतर दक्षिणेकडील या राज्यात ‘एनडीए’ सरकार स्थापन होईल. तामिळनाडूमधील ‘डीएमके’ सरकार केवळ भ्रष्टाचारातच गुंतले आहे, त्यामुळे उद्योग व तरुण मोठ्या प्रमाणात राज्याबाहेर स्थलांतर करत आहेत. दरम्यान, लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत विचारले असता ते म्हणाले की, हा मुद्दा द्रमुक पक्षाने २०२६ च्या राज्य निवडणुकीच्या दृष्टीने उपस्थित केला आहे. केंद्र सरकारने मतदारसंघ पुनर्रचनेबाबत काही सांगितले आहे का? मग त्यांनी आत्ताच हा मुद्दा का उपस्थित केला?

वंशवादी राजकारण
शहा म्हणाले, द्रमुक अध्यक्ष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना त्यांचे पुत्र व मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना उत्तराधिकारी बनवायचे आहे. कारण हा पक्ष वंशवादी राजकारण करत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR