लातूर : प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार ग्रुपच्या वतीने वारक-यांना मोफत बस सेवा व अल्पउपहार सेवा केली जाते. याही वर्षी दि. ५ जुलै रोजी सकाळी लातूर, छत्रपती संभाजीनगर, उदगीर, अंबाजोगाई, अहमदपूर येथून ३७ एस. टी. बसेसच्या माध्यातून १५०० ते १८०० वारक-यांना पंढरपुर वारीसाठी विनामुल्य मार्गस्थ करण्यात आले.
यावेळी द्वारकादास शामकुमारचे संचालक तुकाराम पाटील याच्या मार्गदर्शनाखाली वारक-यांचा यथोचित सत्कार करून प्रवासासाठी ब्लँकेट, अल्पोपहार व पाणी बॉटल सोबत देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नॅचरल शुगरचे संचालक बी. बी. ठोंबरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, लातूर शहर डीवायएसपी रणजित सावंत, दशरथआण्णा जाधव पाटील, डॉ. सुधीर फत्तेपुरकर, डॉ. सतीश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. तुकाराम पाटील मित्र मंडळाचे निलेश राजेमाने यांनी मनोगत व्यक्त करताना द्वारकादास शामकुमारच्या वतीनं घेण्यात आलेल्या अनेक उपक्रमाबदल माहिती देऊन वारक-यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी तुकाराम पाटील मित्र मंडळाचे श्रीकांत हिरेमठ, निलेश राजमाने, सच्चिदानंद ढगे, सुदाम पवार, राजुभाऊ पाटील, कैलास मंत्री, अॅड. दासराव शिरुरे, वनिता काळे, संदिपान माने, बालाजी जाधव , श्री जीवनजी जाधव, मिथुन दिव, रागिणी यादव, पत्रकार इस्माईल शेख, पत्रकार आसिफ सय्यद, प्रमोद भोयरेकर, अनंत सूर्यवंशी, आसिफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते. आभार तुकाराम पाटील यांनी व्यक्त केले.