लातूर : प्रतिनिधी
खास प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभुमीवर व्हाईट प्रेमींसाठी येथील द्वारकादास शामकुमारमध्ये व्हाईट कपड्यांचे मिस्टर व्हाईट प्रदर्शन व विक्रीचा शुभारंभ माजी आमदार वैजनाथराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, यशवंतराव पाटील, अशोक भूतडा, डॉ. सुधीर फत्तेपूरकर, दयानंद पाटील, भागवत फुंदे, दिलीप माने, अभय शाह, मंगेश झोले, अविनाश देवसटवार, विजय नावंदर, अशोक चव्हाण, रामदास पवार यांची उपस्थिती होती. या व्हाईट हाऊस क्लबमध्ये भारतातीलच नव्हे तर विदेशातील ब्रँडचे शुभ्र पांढरे कपडे ५० टक्के कमी दरात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. गाहकांनी या मिस्टर व्हाईट प्रदर्शन व विक्रीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक तुकाराम पाटील यांनी केले आहे.