डर्बन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. डर्बनमधील तग्समीड येथे होणारा सामना पावसामुळे होऊ शकला नाही. दुपारपासूनच डर्बनमध्ये पावसाने हजेरी लावली. सततच्या पावसामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही. त्यामुळे हवामान आणि मैदानाची स्थिती लक्षात घेऊन पंचांनी हा सामना रद्द केला. हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. पण पावसामुळे त्यांच्या पदरी निराशाच पडली.