28.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeक्रीडाद. आफ्रिकेचा इंग्लंडला दे धक्का

द. आफ्रिकेचा इंग्लंडला दे धक्का

अ‍ँटिग्वा : गतविजेत्या इंग्लंडला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर ८ गटातील दुस-या सामन्यात विजयाने थोडक्यात हुलकावणी दिली. २० व्या षटकात एडन मार्करमने घेतलेला झेल सामन्याला कलाटणी देणारा ठरला. इंग्लंडला विजयासाठी १८ चेंडूत २५ धावांची गरज होती. त्यावेळी कागिसो रबाडाने सेट फलंदाज लिएम लिव्हिंगस्टोनला माघारी पाठवून हॅरी ब्रूकसोबतची ७८ धावांची भागीदारी तोडली. त्यानंतर मार्को यानसेन व एनरिच नॉर्खियाने अखेरच्या दोन षटकांत सामना खेचून आणला.

क्विंटन डी कॉकने ३८ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ६५ धावा केल्या. क्विंटन व रिझा हेंड्रिक्स (१९) यांनी पहिल्या विकेटसाठी ९.५ षटकांत ८६ धावा जोडल्या. सहा धावांनंतर क्विंटन माघारी परतला आणि इंग्लंडच्या गोलंदाजांना पुनरागमन करण्याची संधी मिळाली. हेनरिच क्लासेन (८) दुर्दैवीरित्या रन आऊट झाला. कर्णधार एडन मार्करम (१) हाही आदिल राशीदच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. डेव्हीड मिलर खेळपट्टीवर उभा राहिला आणि त्याने २८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४३ धावांची खेळी केली. जोफ्रा आर्चरने २० व्या षटकात मिलरसह दोन धक्के दिले. त्रिस्तान स्तब्सने नाबाद १२ धावा केल्या आणि आफ्रिकेने ६ बाद १६३ धावांपर्यंत मजल मारली. पण इंग्लंडला ६ बाद १५६ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR