बीड : प्रतिनिधी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर आले आहेत. हत्या प्रकरणात पोलिसांनी १५०० पेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. धनंजय देशमुख यांनी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी देहदान आणि वन्य प्राण्यांना मदत करण्याचा संकल्प केला आहे. त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्राला हादरवणा-या संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे अधिवेशन सुरू झाल्यावर धनंजय मुंडे यांंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. देशमुख परिवार अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. तर आज संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्या भावाचा वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसादिवशी धनंजय देशमुख यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
वाढदिवसानिमित्त वन्य प्राण्यांना चारा पाण्याची व्यवस्था करायची त्याचबरोबर जे अनाथ आश्रम आहेत त्या ठिकाणच्या मुलाना दत्तक घ्यायचे, जे वन्यजीव प्रकल्प आहेत त्या वन्यजीव प्रकल्पाच्या ठिकाणी जे औषध उपचार लागणार आहेत. त्यासाठी ते मेडिसिन त्या ठिकाणी द्यायचे आणि मी माझ्या जन्मदिनाच्या दिवशी एक संकल्प केला आहे की, मी देहदानाचा संकल्प केला आहे त्याचा मी अर्ज आंबेजोगाई येथील उपजिल्हा रुग्णालय येथे भरून दिला आहे. माझ्या भावाचा लढा आहे त्यासाठी मी हा संकल्प केलेला आहे, आणि माझ्या भावासाठी मी न्याय मिळवण्यासाठी लढणार आहे आणि एवढेच नाही तर मी या दुष्ट प्रवृत्ती हटवण्यासाठी मी लढणार आहे. यासाठी मला तुम्ही सर्वांनी मदत केली आहे.