बीड : प्रतिनिधी
आश्रमशाळेवर तब्बल १८ वर्षे शिक्षक म्हणून नोकरी केल्यानंतरही ना पगारीचा पत्ता, ना कायम होण्याची शाश्वती, त्यातच संस्थाचालकांकडून होणारा त्रास अस झाल्याने एका शिक्षकाने भावनिक फेसबुक पोस्ट लिहून बँकेच्या दारातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. धनंजय अभिमान नागरगोजे असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
नागरगोजे मागील १८ वर्षांपासून विनाअनुदानित आश्रमशाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. १८ वर्षांपासून काम करत असूनही वेतन मिळत नव्हते त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय नागरगोजे यांच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे.
केज तालुक्यातील केळगाव येथे एक आश्रमशाळा आहे. या शाळेत दिवंगत धनंजय नागरगोजे १८ वर्षे कार्यरत होते. मात्र, त्यांना १८ वर्षे पगार न मिळाल्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले. अवघ्या तीन वर्षीय लेकीला पत्र लिहून माफी मागत त्यांनी आत्महत्या केली. गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेनंतर सुप्रिया सुळेंनी कुटुंबाला आधार देण्याचे ठरवले आहे. नागरगोजे यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सुप्रिया सुळेंनी घेतली आहे. त्याचबरोबर नागरगोजे यांच्या पत्नी आणि दीराला रोजगार मिळावा यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
केळगाव येथील आश्रमशाळेत धनंजय नागरगोजे कार्यरत होते. ते मागील १८ वर्षांपासून विनाअनुदानित आश्रमशाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. १८ वर्षांपासून काम करत असूनही वेतन मिळत नव्हते असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी शाळेच्या संचालकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच मुलांसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी काही करू शकलो नाही, असे म्हणत त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.