बीड : प्रतिनिधी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा नुसता राजीनामा नको, तर कलम ३०२ लावले पाहिजे आणि जेलमध्ये टाकले पाहिजे. या सगळ्याला धनंजय मुंडे हेच जबाबदार आहेत, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंडेंवर करत टीकास्त्र डागले आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांची छळ करुन हत्या केल्याचे फोटो आणि काही व्हीडीओ समोर आले आहेत. यानंतर धनंजय मुंडे यांच्याविरोधातही मनोज जरांगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे बोलताना जरांगे म्हणाले, मुंडेंना पैसे गोड लागले. आतापर्यंत त्यांचे लोक कुणाचाही खून करायचे. पैसे मिळायचे म्हणून त्यांना मोकळे सोडले होते. धनंजय मुंडेंचे हे लोक आहेत. खंडणी मागितली, खून केल्याची त्यांना माहिती होती. धनंजय मुंडेंवर कलम ३०२ नुसार कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.