35.6 C
Latur
Sunday, March 16, 2025
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या; भर मोर्चात संदीप क्षीरसागर संतापले

धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या; भर मोर्चात संदीप क्षीरसागर संतापले

बीड : बीड हा जिल्हा पुरोगामी विचारांचा आहे. मी ओबीसी आहे. माझी थेट मागणी आहे, या वाल्मिक कराडला तुरुंगात टाका. वाल्मिक कराड याला धनंजय मुंडे यांचे संरक्षण आहे. ही केस फास्ट ट्रॅकवर चालवावी . तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

विन मीलच्या प्रकरणात असलेला सुरक्षारक्षक हा बौद्ध समाजाचा होता. संतोष देशमुख हे मराठा समाजाचे होते. त्यावेळी खंडणीसाठी विन मील कंपनीत गेलेल्या वाल्मिक कराड याच्या गुंड सहका-यांनी त्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली.

सुरुवातीला सुरक्षा रक्षकाने त्या गुंडांना अडवले पण तरीही त्यांनी त्याला मारले. मी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात भाष्य केले. बीड हा जिल्हा पुरोगामी विचारांचा आहे. मी ओबीसी आहे. माझी थेट मागणी आहे, या वाल्मिक कराडला तुरुंगात टाका, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR