24.5 C
Latur
Saturday, January 25, 2025
Homeउद्योगइलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची २०२७ सालापर्यंत भरभराट?

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची २०२७ सालापर्यंत भरभराट?

तब्बल १२ दशलक्ष नवे रोजगार निर्माण होणार उत्पादन ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याचे लक्ष्य

मुंबई : देशात सध्या वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योग, रोजगार वाढवण्यावर भर दिला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून आयटी, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. आगामी काही वर्षात या क्षेत्राचा चेहरामोहरा बदललेला असणार आहे. असे असतानाच आता २०२७ सालापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रात १२ दशलक्ष नव्या नोक-या निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला जातो.

टीमलिज डिग्री अ‍ॅप्रेंडशीप या संस्थेच्या रिपोर्टनुसार २०२७ सालापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात मोठी भरभराट होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील नव्या नोक-यांची संधीदेखील वाढणार आहे. २०२७ सालापर्यंत ३ दशलक्ष प्रत्यक्ष तर ९ दशलक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. याच रिपोर्टनुसार प्रत्यक्ष नव्या नोक-यांध्ये १ दशलक्ष नोक-या या अभियंत्यांना, २ दशलक्ष नोक-या या आयटीआय क्षेत्रातील ज्ञान असलेल्यांना तर ०.२ दशलक्ष नोक-या या कृत्रिम बुद्धीमत्ता, मशिन लर्निंग, डेटा सायन्स आदी क्षेत्रात पारंगत असणा-यांना नोक-या मिळू शकतात. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आगामी वर्षात होणारी ही प्रगती लक्षात घेता त्याचा अर्थव्यवस्था वाढीलाही मोठा हातभार लागण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात भारत अधिकाधिक पुढे जावा यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जाणार आहेत. २०३० सालापर्यंत या क्षेत्राचे उत्पादन ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे लक्ष्य गाठायचे असेल तर पुढील पाच वर्षे या क्षेत्राची पाच पटीने वाढ झालेली असायला हवे. सध्या भारताचे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रआतील देशांतर्गत उत्पादन १०१ अब्ज डॉलर्स आहे. यात मोबाईल फोन्सच्या उत्पादनाचा वाटा ४३ टक्के, कन्झ्यूमर आणि इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचा वाटा १२ टक्के आणि इलेक्ट्रॉनिक्स घटकांच्या उत्पादानांचे योगदान ११ टक्के आहे.

भविष्यात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची भरभराट होणार
टीमलिज डिग्री अ‍ॅप्रेंडशीप या संस्थेच्या रिपोर्टनुसार भारतात सध्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात मोठी प्रगती होत आहे. ही प्रगती लक्षात घेता भारत लवकरच ग्लोबल इलेक्ट्रॉनिक हब म्हणून नावारुपाला येऊ शकतो. आर्थिक वर्ष २०२३ चा विचार करायचा झाल्यास भारतातील एकूण व्यापार निर्यातीतील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचे योगदान हे सध्या ५.३ टक्के आहे. भविष्यात हे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र पाच पटीने वाढणार?
इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आगामी वर्षात होणारी ही प्रगती लक्षात घेता त्याचा अर्थव्यवस्था वाढीलाही मोठा हातभार लागण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात भारत अधिकाधिक पुढे जावा यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जाणार आहेत. २०३० सालापर्यंत या क्षेत्राचे उत्पादन ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे लक्ष्य गाठायचे असेल तर पुढील पाच वर्षे या क्षेत्राची पाच पटीने वाढ झालेली असायला हवे. सध्या भारताचे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील देशांतर्गत उत्पादन १०१ अब्ज डॉलर्स आहे. यात मोबाईल फोन्सच्या उत्पादनाचा वाटा ४३ टक्के, कन्झ्यूमर आणि इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचा वाटा १२ टक्के आणि इलेक्ट्रॉनिक्स घटकांच्या उत्पादानांचे योगदान ११ टक्के आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR