22.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरधनगर बांधवांनी साळुंके यांना आशीर्वाद द्यावेत

धनगर बांधवांनी साळुंके यांना आशीर्वाद द्यावेत

निलंगा :  प्रतिनिधी
राज्यात महागाई, बेरोजगारी वाढली असून शेतीमालाला भाव नाही. तरुणाच्या हाताला काम नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. तरुणाई नैराशातून जीवन जगत आहे. ही परीस्थिती बदलण्यासाठी आपणाला आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून निलंगा विधानसभा मतदारसंघातील सर्व धनगर व इतर समाज बांधवानी अभय साळुंके यांना आशीर्वाद द्यावेत असे आवाहन अहिल्याबाई होळकर यांचे वंशज भूषणराव राजे होळकर यांनी केले.
निलंगा विधानसभा काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंके यांच्या प्रचारार्थ येथील वृंदावन मंगल कार्यालयात आयोजित धनगर समाज मेळाव्यात ते बोलत होते. मंचावर माजी आ. रामहरी रुपणवर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ अरंिवद भातांब्रे, माजी प.स सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, निलंगा तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, ईस्माईल लदाफ,  लक्ष्मण कांबळे, शेतकरी संघटनेचे राजकुमार सस्तापुरे, मिथुन दिवे, महेश देशमुख, अजित नाईकवाडे, गोंिवद सूर्यवंशी अदी उपस्थित होते.
भूषणराव राजे होळकर म्हणाले की, सन २०१४ मध्ये बारामती येथे धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी हजारो धनगर बांधव उपोषणाला बसले होते. त्या ठिकाणी तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी उपोषणस्थळी भेट देत युती सरकारला निवडून द्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतो असे अश्वासन देऊन संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाचे मतदान मिळवले मात्र गत दहा वर्षात अनेक बैठका झाल्या मात्र धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत ते बोलले नाहीत . यामुळे धनगर समाजाची फसवणूक करण्याचे काम महायुती सरकारने केल्याचा घणाघाती आरोप भूषणराव राजे होळकर यांनी यावेळी
केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR