वलांडी : देवणी तालुक्यातील धनेगांव तांडा येथील वस्तीलगत असलेला पाझर तलाव क्र.४ हा धनेगांव तांड्याच्या पुर्वैस हा वस्तीलगत हा पाझर तलाव आहे. सततच्या अतिवृष्टीमूळे सदरील तलाव हा पुर्ण क्षमतेने भरला आहे. सदरील तळ्याचे काम हे ब-याच वर्षापुर्वी झालेले आहे. या सततच्या पावसामूळे तळ्याची वस्तीलगतची पाळुची बाजु ही घसरत असून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. त्यामूळे पाळूला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. यातून पाणी मोठ्या प्रमाणात वाहुन जात आहे. यामूळे जर पाण्यामूळे पाळू ढासाळली तर तांड्यावरील ब-याच घरात पाणी घूसणार असून यात जिवीतहानी होण्याची शक्यता आहे.