31.2 C
Latur
Sunday, May 18, 2025
Homeलातूरधम्म संस्कारामुळे भारताला बुद्धकालीन वैभव प्राप्त होईल

धम्म संस्कारामुळे भारताला बुद्धकालीन वैभव प्राप्त होईल

लातूर : प्रतिनिधी
तथागत बुद्ध व सम्राट अशोक यांच्या काळातील भारत निर्माण करावयाचा असेल तर धम्म संस्थेच्या वतीने राबविण्यात येणा-या २४ प्रकारच्या शिबिरामध्ये उपासक उपासिकांनी व त्यांच्या पाल्यांनी सहभागी झाले पाहिजे, असे नमुद करुन डॉ. भीमराव आंबेडकर यांनी धम्म संस्कारामुळे भारताला बुद्धकालीन वैभव प्राप्त होईल, असे सांगीतले.
लातूर शहरातील बुद्ध गार्डनमध्ये दि. ८ ते १८ मे या कालावधीत भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातूर पश्चिम यांच्या वतीने दहा दिवसीय श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप प्रसंगी डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.  पुढे बोलताना ते म्हणाले आंबेडकरी चळवळीचा अकोला पॅटर्न निर्माण झाला आहे त्याच धर्तीवर बौद्ध धम्म चळवळीचा लातूर पॅटर्न निर्माण व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
याप्रसंगी संघाचे संघनायक भन्ते महाविरो थेरो काळेगाव, व भन्ते पी. धम्मानंद, धम्म संस्थेचे ट्रस्टी तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैननिक दलाचे स्टाफ ऑफिसर अ‍ॅड. एस.  के. भंडारे, महाराष्ट्र राज्याध्यक्ष   यु. जी. बोराडे, राज्यसंघटक प्रा. बापूसाहेब गायकवाड, डी. एस. नरसिंगे, दैवशाला गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्षा आशाताई चिकटे होत्या. यावेळी बीएसएनएलचे महाप्रबंधक अनिल बनसोडे, सार्वजनिक बांधकाम विभाग उपाभियंता संजय सावंत, गोदावरी हॉस्पिटलचे संचालक डॉ. सदानंद कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष सुशीलभाऊ चिकटे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, प्रदीप आचार्य, केंद्रीय शिक्षक नाना बागुल गुरुजी यांची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस अभिमन्यू लामतुरे व डिव्हिजन ऑफिसर विलास आल्टे यांनी केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी  शारदाताई हजारे, वंदनाताई कांबळे, अर्जुन कांबळे, मायाताई कांबळे,  गौतम बनसोडे, मेजर जनरल राजाराम साबळे, मंगलताई सुरवसे, राजेंद्र क्षीरसागर, विकास दंतराव, ज्ञानेश्वरी  बटवाड, प्रेमनाथ कांबळे, दत्तात्रय भोसले, राजाभाऊ उबाळे, रवींद्र राजेगावकर, आनंद डोणेराव, लक्ष्मण कांबळे, प्रा. भाऊराव कांबळे, रतन आचार्य, संतोष कांबळे केळगावकर, दिलीप बौद्धवीर, व्ही. के. आचार्य, शोक कांबळे, डॉ. भाऊसाहेब आदमाने, विद्याताई ससाने, राजेंद्र हजारे, बिभीषण माने, विनोद टेंकाळे,  महादेव गायकवाड, प्रकाश अडसुळे, सुनील कांबळे, प्रा. प्रशांत उघाडे यांनी परिश्रम घेतले. सदरील कार्यक्रमास बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR