लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी धिरज देशमुख यांना पाच वर्षांपुर्वी भरभरुन आशिर्वाद दिले. त्यामुळे ते आमदार झाले. आमदार झाल्यानंतर धिरज देशमुख यांनी लातूर ग्रामीणचा प्रामाणिकपणे सर्वांगिण विकास केला. हा विकास मतदारांच्या आशिर्वादामुळे होऊ शकला. त्यामुळे आगामी काळातही मतदारांनी आमदार धिरज देशमुख यांच्या पाठीशी आशिर्वाद कायम ठेवावे, असे आवाहन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर तालुक्यातील सामनगाव व चिखुर्डा येथे दि. १४ संप्टेंबर रोजी महिला बचत गटांचा मेळावा घेण्यात आला. त्याप्रसंगी बचत गटांच्या महिलांना संवाद साधताना श्रीमती वैशालीताई देशमुख बोलत होत्या. यावेळी रीड लातूरच्या अध्यक्षा सौ. दीपशिखा धीरज देशमुख, सुनिता अरळीकर,दैवशाला राजमाने, रविंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. लातूर तालुक्यातील सामनगाव येथे गुरूलिंग बुलबुले यांच्या निवासस्थानी बचत गटांच्या महिलांची बैठक झाली.
यावेळी झालेल्या बैठकीत बोलतांना श्रीमती वैशालीताई विलासराव देशमूख म्हणाल्या कि, गेली दहा वर्ष आपल्या पक्षाचा खाजदार नव्हता यंदा आपल्या पक्षाचा खाजदार आपन सर्वानी निवडून दिला आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांचे आभार. पुरूष मंडळींच्या सभा होत असतात. पुरूष मंडळी कोटेही जाते, मात्र महिलांना कुटेही जाता ऐत नाही म्हणून आम्ही तूमच्या अडी-अडचणी जाणून घेण्यासाठी आलो आहेत. आज ज्या महिला आल्या नाहीत त्यांना तूमी सागा कॉग्रेस पक्षहा सर्व गोर-गरीब, शेतकरी यांना सोबत घेवून चालनारा पक्ष आहे. भाजप सरकारने गेल्या दहा वर्षात अनेक आश्वासन आपल्याला दिले आहेत. पहिल्या पाच वर्षात त्यांनी सागीतले कि, आम्ही बाहेर असलेला काळा पैसा भारतात आणू आणि गौर गररीब जनतेला प्रतेकि १५ लाख रूपये देवू मात्र आज पर्यंत या सरकारने एक रूपयाही दिला नाही. त्यानंतर त्यानी सागीतले कि, युवक-युवतीना वर्षाला २ काटो नोकरी देणार असल्याचे सांगीतले मात्र तेहि या सराकारने दिले नाही. त्याचबरोबर आता लाडकी बहिन योजना या सरकारने काडली आहे. मात्र ही योजना निवडणूक होई पर्यंत चालू राहणार आहे. या सरकारचे लबाड्याच अवतन आहे. त्यामुळे या सरकारच्या जाहिरातीला बळू पडू नका असे आवाहन केले.
गेल्या अनेक वर्षापासून आपन सर्वानी पाहयल आहे. कि,कॉग्रेस पक्षाने आपल्या लातूर ग्रामीनसह जिल्ह्याचा विकास केले आहे. पुढील काळातही आपला आशिर्वाद ग्रामीनचे लोकप्रिय आमदार धिरज देशमुख यांना द्यावा. या विधानसभेत महायुतीचे सरकार पडणार आहे. आणि आपले सरकार येणार आहे. आपन आपल्या कॉग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहयच आहे. आपल्या आशिर्वादामुळे लोकसभेला कॉग्रेस पक्षाचा उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना १ लाख ६२ हजार अधिक मतानी खाजदार म्हणून निवडून दिलात. तोच आशिर्वाद परत लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांना देण्याचे आवाहन केले. हे महायुतिचे सरकार खोट्या जाहीराती करीत आहे. कॉग्रेस पक्षानी केलेले काम त्यांनी केले असे खोट्या जाहीराची फलक ते लावत आहेत. त्यांच्या या खोट्या जाहीराला बळी पडू नका असे आवाहन यावेळी केले.
महाविकास आघाडीचे खाजदार डॉ. शिवाजी काळगे यांनी आपन सर्वाधिक मतानी लोकसभा निवडणूकित विजयी केला आहात त्याबद्दल धन्यावाद.. कॉंग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अनेक योजना राबल्या आहेत. मात्र त्या योजनेची खोटी जाहीरात कधीच कॉंग्रेस पक्षाने केली नाही. आपल्या पक्षाच्या योजना ही गोर-गरीब, शेतकरी, मजुर यांच्यासाठी राबवल्या जातात. त्यामुळे महाराष्ट्रात आपले हक्काचे सरकार आणायचे आहे. त्यासाठी आपले लातूर ग्रामींणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांना येणा-या विधानसभा निवडणूकीत आपला भाऊ, मुलगा निवडणूकीच्या मैदानात आहे म्हणून मोठ्या मताधीक्यानी विजयी करुन आपल्या लातूर ग्रामीणचा विकास करायची संधी पुन्हा एकदा द्यावी असे, आवाहन केले.
यावेळी रीड लातूरच्या संस्थापिका सौ. दीपशिखा धीरज देशमुख म्हणाल्या, आज आपल्या गावात येऊन आपल्याशी संवाद साधून आपल्या अडी-अडचणी जाणून घेऊन आनंद वाटला. गेल्या पाच वर्षांमध्ये आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी आमदार म्हणून काम करताना जास्तीत जास्त विकास योजना गावापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला प्रत्येक गावामध्ये त्यांनी गार-गरीब, शेतक-यांसाठी विविध योजनेच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे देखील आपल्यासाठी ते असेच काम करीत राहणार आहेत. त्यामुळे आपन सर्वानी साहेबांना सर्वाधिक मतदान करून येणा-या विधानसभा निवडणूकीत निवडून देण्याचे आवाहन केले.
यावेळी सामनगाव महिला संवाद मेळाव्यास झुंबर बुलबुले, शोभा बुलबुले, अर्चना बुलबुले, शांताबाई बुलबुले, शुभांगी बुलबुले, सुनिता बुलबुले, पार्वती झुंझारे, सुरेखा बुलबुले, यमुना बुलबुले तर चिखुर्डा महिला मेळाव्यास रनजना कदम, मुमताज शेख, जयश्री काळे, सुलताना शेख, सुप्रिया कुंभार, राणी कदम, शिला मुटकुले, दैवशाला घाडगे, संगीता घाडगे, कविता सुरवसे, सारिखा चव्हान आदींसह महिला उपस्थित होत्या.