29.2 C
Latur
Sunday, May 11, 2025
Homeमहाराष्ट्रधीरज शर्मा यांचा अजित पवार गटात प्रवेश

धीरज शर्मा यांचा अजित पवार गटात प्रवेश

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा यांनी शरद पवार गटाला रामराम ठोकत अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

तर युवती राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन देखील पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे समोर आले आहे. यावरून आता राज्यापाठोपाठ देशपातळीवर देखील शरद पवारांना धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटातील प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी एक मोठा दावा केला आहे. धीरज शर्मा यांनी आज अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईत अजित पवार गटात प्रवेश केला.

यावर धीरज शर्मा यांच्या प्रवेशाने ब-याच गोष्टी अधोरेखित केल्या आणि प्रश्नही उपस्थित झाले. तुतारी गटातील दोन गुंडे ज्यांनी अख्ख्या पक्षाची वाट लावली. यांच्याच गुंडागर्दीमुळे पक्ष संपत गेला आहे, असे म्हणत अमोल मिटकरी यांनी शरद पवार गटातील आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, अजितदादांनी निर्णयासोबत हळूहळू लवकरच युवा पिढी संपूर्ण देशात उभी राहील, असे म्हणत लवकरच धमाका नं. २ होणार असा दावा देखील अमोल मिटकरी यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR