पुणे : प्रतिनिधी
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे असलेली १५ गुंठे जमीन खरेदी केली होती. यात सातबारातील आपल्या नावातील वडिलांचे नाव त्यांनी बदलले आहे. दिलीप धोंडिबा खेडकर ऐवजी आता नवीन नाव दिलीप कोंडिबा खेडकर असा बदल केला आहे.
दिलीप कोंडिबा खेडकर यांनी १४ वर्षांपूर्वी ही जमीन खरेदी केली आहे.
त्याचा सातबाराही उपलब्ध आहे. वागळवाडी येथे दिलीप खेडकर यांची १४ गुंठे जमीन असल्याचे पुण्याचे आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उघड केले होते. ही जमीन विक्री करायची असल्याने त्या ठिकाणी खेडकर कुटुंबीयांनी तसा बोर्ड लावला आहे. जमिनीची किंमत दीड कोटी असल्याचे सांगितले जात आहे. आता सातबारावर नव्याने नाव कोंडिबा केले आहे.
पूजा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस
पूजा खेडकर यांना डिपार्टमेंट ऑफ परसोनेल अँड ट्रेनिंग विभागाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. २ ऑगस्टपर्यंत नोटीसवर उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहे. याप्रकरणी पूजा खेडकर यांच्या ईमेल तसेच रहिवासी पत्त्यावर नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे.