19.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्र‘नकोशा’ उमेदवारांचे विधानसभेसाठी साकडे!

‘नकोशा’ उमेदवारांचे विधानसभेसाठी साकडे!

मुंबई : विशेष प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीमध्ये संधी नाकारण्यात आलेल्या आणि पराभूत झालेल्या काही माजी खासदारांनी आपली पावले आता विधानसभेच्या दिशेने वळविली आहेत.

मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून यावेळी काँग्रेसने प्रिया दत्त यांच्याऐवजी वर्षा गायकवाड यांना तर भाजपने पूनम महाजन यांच्याऐवजी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली होती. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याविरोधात वांद्रे पश्चिममधून काँग्रेसने प्रिया दत्त यांना उमेदवारी देण्याचे ठरविले आहे.

काँग्रेसचे संजय निरूपम यांना २०१४ मध्ये भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी पराभूत केले. निरूपम सध्या शिंदेसेनेत असून, त्यांनी दिंडोशीतून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. चेंबूरमधून श्ािंदेसेनेचे उमेदवार म्हणून शेवाळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

‘नकोशा’ उमेदवारांना संधी
भाजपने मनोज कोटक (मुंबई उत्तर पूर्व), पूनम महाजन (मुंबई उत्तर मध्य) आणि गोपाळ शेट्टी (मुंबई उत्तर) यांच्याऐवजी नव्या चेह-यांना संधी दिली होती. ज्या खासदारांना तिकीट नाकारले त्यांना विधानसभेत उमेदवारी देण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना दिल्लीमधून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेट्टी यांना बोरिवली आणि कोटक यांना मुलुंडमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर पूनम महाजन यांच्याबाबत अद्याप काही निर्णय झालेला नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे पूनम महाजन काय निर्णय घेणार, याकडेही लक्ष लागले आहे.

‘नकोसे’ ठरलेले उमेदवार
गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, संजय निरूपम, राहुल शेवाळे, प्रिया दत्त, पूनम महाजन.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR