21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमुख्य बातम्यानक्षल्यांच्या बिमोडासाठी ४ हजार सैनिक मोहीमेवर

नक्षल्यांच्या बिमोडासाठी ४ हजार सैनिक मोहीमेवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
येत्या दोन वर्षात देशातून नक्षलवाद्यांचा समूळ नायनाट केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी १५ दिवसांपूर्वी केली होती. या दिशेने केंद्रानेही आपली पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ४,००० सैनिकांना मोहीमेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. नक्षलवाद्यांचा खात्मा करणे, हे एकच ध्येय त्यांचे असेल.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या महिन्यात छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये नक्षलवाद्यांना अंतिम मुदत जाहीर करताना, देशाला डाव्या विचारसरणीपासून मुक्त करण्यासाठी ‘मजबूत आणि निर्दयी’ कृती आवश्यक असल्याचे म्हटले होते. त्यानुसार, छत्तीसगडमधील सर्वाधिक नक्षल-ंिहंसाग्रस्त भाग असलेल्या बस्तरमध्ये सीआरपीएफ ४,००० हून अधिक जवानांसह चार बटालियन तैनात करणार आहे. मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद्यांना संपवण्याच्या केंद्र सरकारच्या घोषणेनंतर आता अखेरचा निर्णायक लढा सुरू झाला आहे.

अधिकृत सूत्रांनी सांगितले की, केंद्रीय राखीव पोलीस दलाने झारखंडमधून तीन आणि बिहारमधून एक बटालियन परत बोलावली आहे. राज्याची राजधानी रायपूरच्या दक्षिणेस सुमारे ४५० ते ५०० किलोमीटर अंतरावर असलेल्या बस्तर भागात या तुकड्या तैनात केल्या जातील. या दोन राज्यांमध्ये (झारखंड आणि बिहार) नक्षलवादी कारवाया बंद किंवा नगण्य झाल्या आहेत. त्यामुळे या बटालियनचा छत्तीसगडमध्ये अधिक चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. विशेष म्हणजे, सीआरपीएफच्या एका बटालियनमध्ये सुमारे १ हजार जवान आहेत.

छत्तीसगडमधील दंतेवाडा आणि सुकमा या दुर्गम जिल्ह्यांमध्ये, तसेच ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याच्या त्रि-सीमेवरील दुर्गम ठिकाणी या तुकड्या तैनात केल्या जात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR