चाकूर : प्रतिनिधी
चाकूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते तथा नगरपंचायतचे गटनेते अब्दुल करीमसाब गुळवे हे आज दि. २६ मे रोजी पद्भार स्वीकारणार असून त्यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यांत आलेली आहे. दि २१ मे रोजी नगराध्यक्ष पदासाठी नगर पंचायतीचे गटनेते अब्दुल करीमसाब गुळवे यांनी मुख्याधिकारी प्रतीक लंबे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचाच एकमेव अर्ज नगराध्यक्ष पदासाठी आला असल्याने गुळवे यांची निवड निश्चीतपणे होणार आहे.
नगर पंचायतीत पक्षीय बलाबल याप्रमाणे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ५, भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष ०३ ,भाजप मधील ३ पैकी २, प्रहार मधील ६ पैकी ४ नगरसेवकांचा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व महायुतीचे उमेदवार अब्दुल करिमसाब गुळवे यांच्या पाठीशी असे एकूण १४ नगरसेवक आहेत. आज दिं २६ मे रोजी अब्दूल करीमसाब गुळवे यांच्या अध्यक्षपदाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.