18 C
Latur
Saturday, November 22, 2025
Homeलातूरनगराध्यक्ष पदाचे ७, नगरसेवक पदाचे १७१ जण रिंगणात

नगराध्यक्ष पदाचे ७, नगरसेवक पदाचे १७१ जण रिंगणात

उदगीर :  प्रतिनिधी
उदगीर नगरपरिषदेचा माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरलेल्या दोघांनी माघार घेतली. नगरसेवक पदासाठी २०० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शेवटच्या दिवशी २९ जणांनी माघार घेतल्याने आता ४० पदासाठी १७१ उमेदवार रिंगणात आहेत.
चौरंगी लढत होणार उदगीर नगर परिषदेची लढत ही चौरंगी होणार असल्याचे चित्र आहे. भाजपा शिवसेना शिंदे गट काँग्रेस व एम आय एम या प्रमुख पक्षात नगराध्यक्ष पदासाठी लढत होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी कादरी अंजुम राष्ट्रीय काँग्रेस, शेख हुस्र बानू अब्दुल सत्तार अपक्ष, सय्यद गुल्फराज ताहेर हुसेन एमआयएम, स्वाती सचिन हुडे भाजपा, उदगीरकर वनिता प्रफुल कुमार आरपीआय आठवले गट, पंचाक्षरी सुनीता शिवसेना शिंदे गट, शेख निलोफार शहाजान प्रहार जनशक्ती पक्ष हे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उभे असून उदगीरकर कोणाला कौल देणार हे येत्या ३ डिसेंबर रोजी कळणार आहे. तब्बल ३५ वर्षे नगराध्यक्ष पद भूषवलेले राजेश्वर निटुरे यांच्या पत्नी  शोभा  राजेश्वर निटूरे यांनी नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु त्यांना भाजपाकडून तिकीट नाकारल्यामुळे फॉर्म मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज परत घेतला आहे त्यामुळे राजेश्वर  निटूरे यांच्या चाहत्यामध्ये नाराजी पसरली. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र  लढत आहे तर युतीतील  शिवसेना  शिंदे गट आरपीआय वेगळे लढत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR