26.8 C
Latur
Saturday, April 5, 2025
Homeअंतरराष्ट्रीयनमाजची ‘इकामत’ लहान करण्याचे कुवैतमध्ये निर्देश;  वीज आणि पाणीटंचाईमुळे घेतला निर्णय

नमाजची ‘इकामत’ लहान करण्याचे कुवैतमध्ये निर्देश;  वीज आणि पाणीटंचाईमुळे घेतला निर्णय

 

कुवैत : कुवैतमधील इस्लामिक अफेयर्स मंत्रालयाने देशभरातील इमाम आणि मुअज्जिन यांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार जुहर आणि असरची नमाजची ‘इकामत’ लहान करावी. तसेच नमाजमध्ये जास्त वेळ लावू नये. मंत्रालयाने इमामांना अपील केली की, इबादत मर्यादीत ठेवा. यामुळे विजेचा वापर कमी होईल.

मंत्रालयातील सर्कुलर नंबर ८-२०२४ नुसार, ऊर्जा, जल आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या शिफारशीनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कुवैतमधील सहा प्रांतात सर्व मशिदीत काही वेळेसाठी वीज पुरवठा बंद राहणार आहे. ही वीज कपात जुहरच्या अजानच्या अर्ध्या तासानंतर राहणार आहे.

कुवेत सरकारच्या राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन मोहिमेचा एक भाग आहे. उन्हाळ्यात विजेची मागणी वाढते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. मशिदींमधील वीज आणि पाण्याचा वापर कमी करून संपूर्ण देशात ऊर्जा संतुलन राखले जाऊ शकते, असा सरकारचा विश्वास आहे. ग्रीडवर लोड वाढत असल्यामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला.

सरकारने मशिदीत करण्यात येणा-या वुजूसाठी पाणी कमी वापरण्याचे निर्देश दिले आहेत. मशीद प्रबंधनाला पाण्याचा अतिवापर रोखण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मशिदीतील संसाधनाची बचत होणार आहे. कुवैत सरकारने सर्वांना निर्देशांचे पालन करुन उर्जा संकटातून बाहेर येण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.
देशातील विजेची मागणी आणि संभाव्य वीज संकट पाहून सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे. त्या निर्णयानुसार देशातील सर्व मशिदीत नमाज लहान करणे आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. अरब टाइम्सच्या वृत्तानुसार, सरकारच्या या निर्णयामुळे धार्मिक समुदायामध्ये नाराजी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR