36.8 C
Latur
Sunday, April 13, 2025
Homeअंतरराष्ट्रीयनमाज पठण न करणा-यांवर तालिबानी पोलिसांची कारवाई; हजारो लोक ताब्यात

नमाज पठण न करणा-यांवर तालिबानी पोलिसांची कारवाई; हजारो लोक ताब्यात

कंदाहार : वृत्तसंस्था
अफगाणिस्तानमधून एक वेगळी बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तानातील तालिबानी पोलिसांनी रमजानच्या पवित्र महिन्यात मशिदींमध्ये नमाज पठण न करणा-या हजारो पुरुषांना तसेच दाढी न ठेवणा-यांना आणि सलून चालकांना देखील ताब्यात घेतले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे.

रमजानच्या महिन्यात अनिवार्य सामूहिक नमाजमध्ये पुरुषांच्या उपस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते. परिणामी काही वेळा जे हजर झाले नाहीत त्यांना मनमानी पद्धतीने ताब्यात घेतले जात असे. याचा महिला आणि पुरुष दोघांवरही नकारात्मक परिणाम झाल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या मिशनने म्हटले आहे.

तालिबान सरकारने सहा महिन्यांपूर्वी लोकांच्या वर्तणुकीवर नियंत्रण ठेवणारे कायदे केले. नैतिकता मंत्रालयाने गेल्या ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानमधील दैनंदिन जीवनाच्या अनेक पैलूंचा समावेश करणारे कायदे प्रकाशित केले. यामध्ये सार्वजनिक वाहतूक, संगीत, शेव्हिंग आणि सणांशी संबंधित नियमांचा समावेश होता.

या कायद्यांतर्गत ताब्यात घेतलेल्या पुरुषांपैकी निम्म्याहून अधिक पुरुषांची दाढीची लांबी किंवा हेअरस्टाईल निश्चित नव्हती. दाढी कापणे किंवा केस कापल्याबद्दल अनेक सलून चालकांना तुरुंगवास भोगावा लागला. या अहवालात म्हटले आहे की, एथिक्स पोलिसांनी योग्य प्रक्रिया आणि कायदेशीर संरक्षणाशिवाय मनमानीपणे लोकांना ताब्यात घेतले. खाजगी शिक्षण केंद्रे, सलून चालक आणि हेअर ड्रेसर, टेलर, वेडिंग कॅटरर्स आणि रेस्टॉरंट्स सारख्या छोट्या व्यवसायांना विशेषत: मोठा फटका बसला. यामुळे उत्पन्न आणि रोजगाराच्या संधी कमी झाल्या किंवा पूर्णपणे गमावल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR