36.5 C
Latur
Saturday, March 15, 2025
Homeमहाराष्ट्रनवनीत राणा ३ लाख मतांनी विजयी नव्हे तर पराभूत होतील

नवनीत राणा ३ लाख मतांनी विजयी नव्हे तर पराभूत होतील

अमरावती : प्रतिनिधी
नवनीत राणा या कालपर्यंत अमरावती जिल्ह्याच्या सून होत्या. आता म्हणतात मी मेळघाटची बेटी झाले आहे. पाच वर्षांत कसे नाते बदलू शकतात? जात प्रमाणपत्र तर खोटे आहेच आणि नातेही खोटे सांगतात.. अमरावतीमधील ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. त्यात जनशक्तीचा विजय होईल. खासदार नवनीत राणा ३ लाख मतांनी विजयी नाही तर पराभूत होतील. आता विजय सत्याचा होईल. अमरावतीत परिवर्तन होईल, असे म्हणत महाविकास आघाडीचे अमरावतीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे.

अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडीची काय ताकद आहे हे आज विरोधकांना दाखवून देऊ. कोणाला उमेदवारी द्यावी हा भाजपचा अंतर्गत विषय आहे. कोणाचेही आव्हान माझ्यासमोर नाही. पाच वर्षे राणांची केवळ अरेरावी सुरू होती. त्यांनी नौटंकी केली. या निवडणुकीत एकतर्फी माझा विजय होणार आहे. विकासाचे मुद्दे घेऊन मी जनतेसमोर जाणार आहे. जिल्ह्यातील अनेक प्रकल्प पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे लोकांना आता परिवर्तन हवे आहे. त्यामुळे लोक महाविकास आघाडीला मतदान करतील. विजय माझाच असेल, असे वानखडे म्हणाले.

वानखडे आज अर्ज दाखल करणार
अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बळवंत वानखडे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने नेहरू मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महारॅली काढली जाणार आहे. आज अमरावतीत महाविकास आघाडी अमरावतीत जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे.

नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध
नवनीत राणा यांच्या विरोधात महायुतीतीलच नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार बच्चू कडू यांच्याकडून अमरावतीमध्ये उमेदवार देण्यात आला आहे. अमरावतीमधील ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब यांनी आमदार राजकुमार पटेल यांच्या उपस्थितीत प्रहारमध्ये प्रवेश केला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात दिनेश बूब प्रहार पक्षाकडून निवडणूक लढणार आहेत. माझ्यासोबत सर्वच पक्षांचे कार्यकर्ते राहतील. काही प्रमाणात युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते देखील माझ्यासाठी काम करतील, असा दावा दिनेश बूब यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR