21.6 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeलातूरनवमतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवून घ्यावे

नवमतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवून घ्यावे

जळकोट: प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाने दि. १ जुलै या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्याचा विशेष संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. ९१ मुखेड विधानसभा मतदरासंघातील ३६२ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओमार्फत दि.२५ जून ते २४ जुलै या कालावधीत दावे हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. या विशेष संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत तयार झालेली अंतीम मतदार यादी दि २० ऑगस्ट रोजी प्रसिध्द होणार आहे. सदर कालावधीत गावातील प्रत्येक नागरीकांनी केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी केले आहे.

बीएलओ घरोघरी भेटी देवून करणार पडताळणी करणार आहेत. २५ जुलै रोजी प्रसीद्ध होणार एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी २५ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत मतदार यादीत नाव नोंदविता येणार आहे मतदारयादीची अंतिम प्रसीद्धी २० ऑगस्टला होणार आहे तसेच २५ जुलै ते ९ ऑगस्ट २०२४ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. या काळातील शनिवार, रविवारी दावे व हरकती स्वीकारण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत १९ ऑगस्ट २०२४ पर्यंत राहणार असून २० ऑगस्ट २०२४ रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी केली जाणार आहे.

१ जुलै रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे सर्व नागरिक मतदार म्हणून नाव नोंदणीस पात्र होणार आहेत. अद्याप मतदार म्हणून नोंदणी केली नसल्यास, अशा नागरिकांना छायाचित्र मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत आपले नाव मतदार म्हणून नोंदवता येणार आहे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्यावीकिंवा ओटर मोबाईल अ‍ॅपचा वापर करावा. तसेच, यापूर्वी प्रसध्­िद करण्­यात आलेली मतदार यादी मतदान केंद्रस्­तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे उपलब्­ध करुन देण्­यात आली आहे. तेव्हा नवतरुण मतदारांनी आपले मतदार यादीत नाव नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR