17.6 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeलातूरनव्या वर्षात सर्व पं. स. ई-ऑफिस प्रणालीवर

नव्या वर्षात सर्व पं. स. ई-ऑफिस प्रणालीवर

लातूर : योगीराज पिसाळ
लातूर जिल्हा परिषदेच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. गेल्या सहा महिण्यापासून जिल्हा परिषदेतही ई-ऑफीस प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कोणत्याही विभागाचे कामकाज मंत्रालयातील सचिवांना कोठूनही पाहता येते. आगदी त्याच प्रमाणे जिल्हयातील १० पंचायत समित्या आता १ जानेवारी पाासून ई-ऑफीस प्रणालीशी जोडल्या जाणार आहेत. सर्व पंचायत समित्या मंत्रालयाशी ई-ऑफीस प्रणालीच्या माध्यमातून जोडल्या जाणार असल्याने लातूर जिल्हा परिषदेच्या प्रमाणेच सर्व पंचायत समित्यांमध्येही पेपरलेस कामकाजाला गती मिळणार आहे.
लातूर जिल्हा परिषदेचे काम पूर्वी ऑफलाईन चालत होते. गेल्या दोन वर्षापासून ई-टपाल प्रणाली सुरू केली होती. अशीच प्रणाली अनेक जिल्हा परिषदेत वेगवेगळा पध्दतीने चालत होती. या प्रणालीमुळे फाईल इनवर्डला दाखल होऊन तीचा प्रवास ऑफलाईन व ऑनलाईन असा दोन्ही प्रकारे चालत होता. यातही बदल होऊन मंत्रालय स्तरावर राबवली जाणारी ई-ऑफीस प्रणाली जून २०२४ पासून लातूर जिल्हा परिषदेतही लागू करण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषदेत दाखल झालेल्या फाईलचा प्रवास आता मंत्रालयात बसलेल्या सचिवांनाही पाहता येतोे. जून पासून लातूर जिल्हा परिषदेत जवळपास ९ हजार ३०० ई-फाईल्स दाखल झाल्या. त्यापैकी जवळपास ९ हजार फाईल्स निकाली निघाल्या आहेत. तर उर्वरीत ई-फाईल्सचा प्रवास विविध टप्प्यावर सुरू आहे. ई-ऑफीस प्रणालीच्यामुळे इनवर्डला दाखल झालेल्या फाईल्सचा प्रवासही सहज पाहता येतो. त्यामुळे कामकाजात गतीमानता व पारदर्शकता आली आहे.
 तसेच फाईल्सची आडवा-आडवीही थांबली आहे.  लातूर जिल्हा परिषदेच्या प्रमाणेच आता नव्या वर्षांत १ जानेवारीपासून सर्व पंचायत समित्यामध्ये ई-ऑफीस प्रणाली कार्यान्वीत करण्यात येणार आहे. त्या संदर्भाने कर्मचा-यांना प्रशिक्षण, यंत्राणा अद्यावत करण्याच्या संदर्भाने हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात लातूर जिल्हयातील सर्व पंचायत समित्या थेट मंत्रालयाशी जोडल्या जाऊन माहितीचे आदान-प्रदान करणेही सोपे जाणार आहे. त्या संदर्भान सर्व पंचायत समित्यांचे ई-मेल आयडी तयार झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR