नांदेड : प्रतिनिधी
मराठवाड्यातील नांदेडमध्ये बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे. लातूरनंतर नांदेडमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने पशुसंवर्धन विभाग अॅक्शन मोडवर आलं आहे. पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना सूरू करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे तातडीने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून ५६५ कुकुट पशुसंवर्धन विभागाने ताब्यात घेऊन त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात असलेल्या किवळा येथील शेतकरी पंजाब टरके यांच्या मोकळ्या कुकुट पालन केंद्रातील कोंबड्याची २० पिल्लं मृतावस्थेत आढळली. अचानक मृत्यू झालेल्या या मृत पिल्लांचं पशुसंवर्धन विभागा मार्फत नमुने तपासण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, मृत पिल्लांचे नमुने पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून, मृत पिल्लांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मृत कुक्कुट पक्षांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे किवळा येथील १० किलोमीटर परिसरात अलर्ट झोन घोषित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तातडीने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून ५६५ कुक्कुट पशुसंवर्धन विभागाने ताब्यात घेऊन त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.