नांदेड : प्रतिनिधी
नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पती -पत्नीच्या अंगावर भिंत कोसळून दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. नांदेडमधील विविध भागांमध्ये संततधार सुरू आहे. यामुळे घरातील कच्च्या मातीची भिंत कमकुवत झाली. यामुळे रात्री सतत पडणा-या पावसामुळे भिंत कोसळली आणि जोडप्याचा जागीच मृत्यू झाला.
शेख नासेर शेख आमीन आणि त्यांच्या पत्नी शेख हसीना शेख नासेर यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. हे जोडपं नांदेडच्या कंधार तालुक्यातील कोटबाजार गावातील रहिवासी होते. नांदेडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सतत पडणा-या पावसामुळे नांदेडमधील गावक-यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र, आता या पावसामुळे २ जणांचा मृत्यू झाला आहे. कोटबाजार गावात जोडप्याचं घर होतं. मात्र, त्यांच्या घराची भिंत कमकुवत झाली होती. रात्रीच्या सुमारास सतत पडणा-या पावसामुळे भिंत कमकुवत झाली.
काही क्षणात रात्रीच्या गाढ झोपेत जोडप्याच्या अंगावर भिंत कोसळली. या भिंतीखाली दबून वृद्ध दाम्पत्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर गावक-यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंगावर भिंत कोसळल्यामुळे वृद्ध दाम्पत्यांनी जागीच प्राण सोडले. या घटनेनंतर गावक-यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

