28.4 C
Latur
Sunday, April 13, 2025
Homeमहाराष्ट्रनागपुरातील ऍल्युमिनियम कंपनीत स्फोट; पाच ठार

नागपुरातील ऍल्युमिनियम कंपनीत स्फोट; पाच ठार

नागपूर : प्रतिनिधी
नागपुरातील स्फोटामुळे कंपनीच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कामगारांच्या मनात प्रचंड दहशत पसरली आहे. आता स्फोटाचे कारण शोधण्यासाठी पोलिस आणि अग्निशमन दलाने तपास सुरू केला आहे. नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.

दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसी परिसरातील एका ऍल्युमिनियम कंपनीत शुक्रवारी संध्याकाळी मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे. स्फोट झाला त्यावेळी कंपनीत १५० कामगार कामावर होते. स्फोटानंतर सर्वांनी बाहेर धाव घेतल्यामुळे अनेकांचे जीव वाचले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. कंपनीतील हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्फोटानंतर निर्माण झालेले धुरांचे लोळ एक किलोमीटरपर्यंत दिसत होते.

कामगार जीव मुठीत घेऊन पळाले
नागपुरातील उमरेड एमआयडीसीत एमएमपी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत अल्युमिनियम फॉईल आणि पावडर तयार केली जाते. या कंपनीत शुक्रवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे काम सुरू होते. १५० कामगार काम करत होते. संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास जोरदार स्फोट झाला. या स्फोटानंतर भीषण आग लागली. स्फोटामुळे येथे काम करणा-या काही कामगारांचे कपडे अंगावरच जळाले. स्फोटानंतर कामगारांनी बाहेर धाव घेतली. आपला जीव मुठीत घेऊन ते बाहेर पळत सुटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR