नागपूर : प्रतिनिधी
नागपुरातील फिल्मसिटीच्या संदर्भात या ठिकाणी अनेक विभागांची संयुक्त बैठक होऊन रामटेकजवळ १२८ एकर जागा फिल्मसिटीसाठी निश्चित करण्यात आली आहे. विदर्भात चित्रपटनिर्मितीला चालना मिळावी यासाठी चित्रपट नगरी निर्माण करण्याचा निर्णय घेतला असल्याची मोठी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.
रामटेकजवळील १२८ एकर जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आगामी पंधरा दिवसांत जिल्हाधिका-यांकडे सादर केला जाईल, असेही ते यावेळी म्हणाले. नागपूर जिल्ह्यातील फिल्मसिटी यशस्वी व्हावी, यासाठी एक कन्सल्टंट नेमण्याचा निर्णय झाला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. ते नागपूर येथे बोलत होते.
दरम्यान, आरबीआयने नियम आणि कायद्याच्या चौकटीत कारवाई केली आहे. या दृष्टीने लोकांचे पैसे सुरक्षित राहावेत, यासाठीच ही कारवाई केली आहे. केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री यावर चर्चा करून सर्व ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहतील, लोकांना पैसे परत मिळतील याची काळजी घेतील, अशी माहितीही सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी यावेळी दिली आहे.