सोलापूर :अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद” सोलापूर या शिखर परिषदेचे दहावे साहित्य संमेलन २६ आणि २७ एप्रिल २०२५ ला नागपूर येथे संपन्न होणार आहे सर्व तयारी झाली आल्याची माहिती केंद्रीय , सचिव अय्यूब नल्लामंदू व संयोजक तथा नागपूरचे ज्येष्ठ साहित्यिक जावेद पाशा कुरेशी यांनी एका पत्रकाद्वारे जाहिर केले आहे .
संमेलनअध्यक्ष माजी कुलगुरु व ज्येष्ठ साहित्यिक डॉ एस एन . असणार आणि प्रा डॉ शरयू तायडे हे स्वागत करणार
प्रा डॉ अनुपमा अजगरेयांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हुसेन दलवाई , ॲड आसीफ कुरेशी , फ म शहाजिंदे , खलील मोमीन , अ कादर मुकादम , डॉ अजीज नदाफ उपस्थित राहतील .
दोन दिवस साहित्यिक मेजवानी असलेल्या या संमेलनाची सुरुवात अय्यूब नल्लामंदू यांच्या कुराण पठणने होणार असून यावळी प्रा. प्रमोद मुनघाटे , जावेद पाशा कुरेशी , नसीमा जमादार , मुजफर सयद , डॉ के जी पठाण , गौस शिकलगर यांच्या पुस्तका सह मुबारक शेख संपादित संमेलनचे मुखपत्र ” म =हाठ वाणी ” व अबरार नल्लामंदू संपादित कासिद संमेलन विशेषांकाचे प्रकाशन सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होईल ‘ त्यानंतर डॉ अलीम वकील संगमनेर , प्रा फ म शहाजिंदे , प्राचार्य फारूक शेख , अय्यूब नल्लामंदू , नौशाद उस्मान , डॉ अस्लम बारी , तहसीन सय्यद , डॉ एस एन पठाण , यांच्या अध्यक्षते खाली विविध सत्रांतून विविध विषया वर विचार मंथान होईल आणि . मिर्जा एक्सप्रेसच्या माध्यरातून मनोरंजन होईल तसेच सिराज शिकलगर यांच्या अध्यक्षतेखाली मिला जुला राष्ट्रीय कवी संमेलन , आणि “सावित्री -फातीमांचीलेकी , महिला साठी स्वातंत्र कवी संमेलनातून कवियित्रीं गाजवणार संमेलन रंगमंच !
तरी या दोन दिवसीय संमेलना मध्ये सामील होण्यासाठी ‘चलो नागपूर .. चलो नागपूर ’ ची हाक परिषदचे उपाध्यक्ष डॉ तांबेळी , सचिव नल्लामंदू , संयोजक जावेद कुरेशी यांनी दिली आहे.