21.7 C
Latur
Saturday, December 14, 2024
Homeमहाराष्ट्रनागपुरात फडणवीसांचे जंगी स्वागत होणार

नागपुरात फडणवीसांचे जंगी स्वागत होणार

नागपूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या भरघोस यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानुसार उद्या रविवार १५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस हे नागपुरात दाखल होत आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच देवेंद्र फडणवीस नागपुरात दाखल होत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे देव दिवाळी नागपुरात साजरी केली जाणार आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या भरघोस यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानुसार उद्या रविवार १५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस हे नागपुरात दाखल होत आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच देवेंद्र फडणवीस नागपुरात दाखल होत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे देव दिवाळी नागपुरात साजरी केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपुरातील त्रिकोणी पार्क परिसरामध्ये सध्या प्रत्येक घरावर विशेष रोषणाई करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस याच त्रिकोणी पार्कचे रहिवाशी आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी परिसरातील नागरिकांनी जय्यत तयारी केली आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या आगमनाच्या दिवशी संपूर्ण परिसरामध्ये रांगोळ्या काढण्यात येणार आहेत. प्रत्येक घरी दिवे लावून देव दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीसांचे जेव्हा त्यांच्या स्वत:च्या निवासस्थानी आगमन होईल त्यावेळी त्रिकोणी पार्क परिसरामध्ये सर्वत्र रोषणाई दिसावी, म्हणून परिसरातील प्रत्येक घरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेला धरमपेठ भाग पूर्णत: भगवामय झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नागपुरात महायुती सरकारचे पहिले अधिवेशन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शपथ घेतल्यानंतर १० दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. रविवार १५ डिसेंबर रोजी हा विस्तार होणार आहे. यासाठी राजभवनात तयारीला सुरुवात झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR