25.7 C
Latur
Tuesday, August 12, 2025
Homeउद्योगनागपुरात हेलिकॉप्टर निर्मिती; २००० लोकांना रोजगार संधी

नागपुरात हेलिकॉप्टर निर्मिती; २००० लोकांना रोजगार संधी

नागपूर : प्रतिनिधी
नागपूर शहरात सुमारे ८,००० कोटी रुपयांची भव्य गुंतवणूक करत हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामध्ये सामंजस्य करार झाला असून, हा ऐतिहासिक करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात पार पडला.
महाराष्ट्रातील हा पहिलाच हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प असून या कराराअंतर्गत मॅक्स एरोस्पेस नागपूरमध्ये २०२६ पासून हेलिकॉप्टर उत्पादन सुरु करणार आहे. आठ वर्षांमध्ये होणा-या या प्रकल्पात सुमारे ८,००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, २,००० लोकांना रोजगार संधी निर्माण होणार आहे. या उपक्रमामुळे नागपूरचे संरक्षण उत्पादन क्षेत्र अधिक मजबूत होणार असून, राज्य सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांना मोठी चालना मिळणार आहे.
या प्रकल्पाची वैशिट्ये……
रोटरी विंग प्लॅटफॉर्म्सचे कस्टमायझेशन, इंटिग्रेशन आणि फ्लाइट टेस्टिंग या क्षेत्रासाठी हा प्रकल्प ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून कार्य करेल. प्रकल्पात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.  नागपूर विमानतळाजवळ प्रकल्प राबविल्यामुळे लोकेशन आणि लॉजिस्टिकचे प्रगत फायदे मिळतील. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असून, यामुळे राज्य हे एरोस्पेस उद्योगासाठी एक केंद्रबिंदू म्हणून विकसित होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR