नागपूर : प्रतिनिधी
नागपूरसह पूर्व विदर्भातील काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. आज बुधवारी सकाळी ७.३० ते ७.३५ या काळात हे धक्के जाणवल्याचे कळते. नागपुरात हनुमाननगर, पायोनिअर कॉलनी येथे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
तेलंगणा येथील मुलुगू या जिल्ह्यात ५.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद करण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू मुलुगू जिल्ह्यापासून ५५ किलोमीटर अंतरावर होता. हे ठिकाण नागपूरपासून सुमारे ४२५ किलोमीटर अंतरावर आहे. तरीसुद्धा पूर्व विदर्भात नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोलीतील अहेरी, आल्लापल्ली या भागांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
पश्चिम विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. विदर्भात अद्याप कुठेही वित्त अथवा जीवितहानी झालेली नाही.
या भूकंपामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. या भूकंपाच्या धक्क्याने मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.तीचे वातावरण
नागपूर : प्रतिनिधी
नागपूरसह पूर्व विदर्भातील काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. आज बुधवारी सकाळी ७.३० ते ७.३५ या काळात हे धक्के जाणवल्याचे कळते. नागपुरात हनुमाननगर, पायोनिअर कॉलनी येथे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
तेलंगणा येथील मुलुगू या जिल्ह्यात ५.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद करण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू मुलुगू जिल्ह्यापासून ५५ किलोमीटर अंतरावर होता. हे ठिकाण नागपूरपासून सुमारे ४२५ किलोमीटर अंतरावर आहे. तरीसुद्धा पूर्व विदर्भात नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोलीतील अहेरी, आल्लापल्ली या भागांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
पश्चिम विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. विदर्भात अद्याप कुठेही वित्त अथवा जीवितहानी झालेली नाही.
या भूकंपामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. या भूकंपाच्या धक्क्याने मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.