31.2 C
Latur
Friday, March 21, 2025
Homeनागपूर हिंसाचारातील दगडफेक; काश्मिर पॅटर्न आला उघडकीस

नागपूर हिंसाचारातील दगडफेक; काश्मिर पॅटर्न आला उघडकीस

मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या गृहमंत्रालयाने नागपूर हिंसाचार प्रकरणात एक नवीन खुलासा केला आहे. काश्मीरमध्ये जशी दगडफेक करण्यासाठी भाडोत्री माणसे आणली जातात, त्याच धर्तीवर नागपूरमध्ये काश्मीर पॅटर्न राबविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणात सखोल तपास करत आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.

नागपूर पोलीस कमिश्नर रविंद्र कुमार सिंघल यांनी संवेदनशील परिसरात दोन हजारांहून अधिक पोलीस तैनात केल्याचा दावा केला आहे. दंगा नियंत्रक पथकही तैनात केल्याची माहिती दिली. याप्रकरणात एकामागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत. या हिंसाचाराचे धागेदोरे बांगलादेशच नाही तर जम्मू आणि काश्मीरसोबत जोडल्याचे तपासात समोर आले आहे.

नागपूर हिंसाचारानंतर सय्यद असीम अली हा पोलिसांच्या रडारवर आला आहे. त्याच्या हालचालीवरही तपास यंत्रणांची नजर आहे. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा पदाधिकारी सय्यद असीम अलीला हिंदू नेत्याच्या हत्या प्रकरणाच्या आरोपात अटक झाली होती.

नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरात राहणारा सय्यद हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा पदाधिकारी होता आणि एक युट्यूब चॅनेल चालवायचा. औरंगजेबाचा कट्टर समर्थक असलेला सय्यद असीम अली हा औरंगजेबाचा खूप गुणगान करायचा.

फहीमचे मालेगाव कनेक्शन
नागपूरच्या दंगलीचा मास्टर माईंड फहीम खानचे मालेगाव कनेक्शन समोर आले आहे. तो ५ महिन्यांपूर्वी मालेगावात आल्याची माहिती समोर आली आहे. फहीम खान मालेगावात आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. विधानसभा निवडणूक वेळी त्याने त्याच्या मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावात पक्षाची बांधणी केली होती. ‘एमडीपी’ पार्टी काढून मालेगाव (मध्य) मधुन मोहम्मद फरान शकील अहमद यांनी निवडणूक लढवली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR