मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी (८ ऑक्टोबर) निधन झाले. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या काही आठवणी सांगितल्या. ‘नाना पाटेकर यांचा हिंदी चित्रपटसृष्टीतील वावर दमदार मराठी माणूस म्हणूनच राहिला. मराठी माणूस काय आहे, स्वाभिमानाच्या दृष्टीने किती संवेदनशील आहे हे त्यांनी दाखवून दिले. नाना पाटेकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाते फार जिव्हाळ्याचे होते.’ असे राऊत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
माध्यमांशी संवाद साधताना खासदार राऊत म्हणाले की, ‘मराठी माणसांच्या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा होता. नानांनी त्यांचे उर्वरित आयुष्य मुंबईसोडून पुण्यात घालवायचे हे ठरवले होते. ते उत्तम मित्र होते. सर्वच राजकीय पक्षात त्यांचा वावर होता. ते अनेकदा नेत्यांना खडेबोल सुद्धा सुनावत होते. आपण समाजासाठी काही तरी देणं लागतो हे नामच्या माध्यमातून दिसून आले. नानांचे जाणं हे महाराष्ट्रासाठी चटका लावणारे आहे. माझ्या आजारपणात नाना मला फोन करत धीर देत होते. शिवसेना परिवारावर त्यांचे विशेष प्रेम होते. उद्धव ठाकरे आणि त्यांचे कलाकार म्हणून चांगली मैत्री होती.’
खासदार राऊत पुढे म्हणाले की, नाना पाटेकर यांचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे चांगले संबंध होते. एकदा बाळासाहेब ठाकरे त्यांच्यावर चिडले त्यावेळी ते मातोश्रीवर आले आणि तुम्ही माझ्या वडीलांसारखे आहात तुम्ही माझ्यावर चिडू शकतात असे म्हटल्याचे मी स्वत: अनुभवले आहे. त्यांनी अनेक राजकीय मते व्यक्त केली आहेत. नाना इतर नेत्याप्रमाणे कधी गप्प बसले नाही. त्यांना जी गोष्ट पटली नाही ती गोष्ट त्यांनी परखडपणे बोलून दाखवली आहे. आपण समाजाचे देणं लागतो म्हणून त्यांनी कायम आपली मते व्यक्त केली आहेत. असे ते म्हणाले.
















