25.1 C
Latur
Friday, May 23, 2025
Homeराष्ट्रीयनापाक कारवाया रोखण्यासाठी पंजाबमध्ये अ‍ॅँटी ड्रोन प्रणाली

नापाक कारवाया रोखण्यासाठी पंजाबमध्ये अ‍ॅँटी ड्रोन प्रणाली

चंदीगड : वृत्तसंस्था
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंजाब सरकारने राज्याला लागून असलेल्या सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टम तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली आहे.

अँटी-ड्रोन सिस्टम तैनात केल्यानंतर, पाकिस्तानकडून येणा-या ड्रोनद्वारे शस्त्रे आणि ड्रग्ज पाठवण्याचा कट अयशस्वी होईल. या तंत्रज्ञानामुळे पोलिस आणि सुरक्षा संस्था पाकिस्तानी ड्रोन तात्काळ शोधून नष्ट करू शकतील.

पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, पंजाब सरकार पंजाबला लागून असलेल्या पाकिस्तानी सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टम तैनात करेल. त्यामुळे पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे शस्त्रे आणि ड्रग्ज पाठवण्याचा कट अयशस्वी होईल. तसेच ड्रोन पाडण्यासाठी अँटी-ड्रोन सिस्टम तैनात केले जातील. या तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिस आणि सुरक्षा एजन्सी पाकिस्तानी ड्रोनच्या घुसखोरीचा तात्काळ मागोवा घेऊ शकतील आणि नष्ट करू शकतील. दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. पाकिस्तानी लष्कराने त्यांच्या चौक्यांवरून विनाकारण गोळीबार सुरू केला. त्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR